Home पुणे खडकवासला धरणात कार कोसळली, कारमध्ये चिमुकलीसह पाच जणांचा समावेश

खडकवासला धरणात कार कोसळली, कारमध्ये चिमुकलीसह पाच जणांचा समावेश

Khadakwasala Dam Accident: पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ भीषण अपघात, भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. एका मुलीचा बुडून (drowned) मृत्यू.

Accident Khadakwasla fell into the water of the dam. A girl drowned

पुणे:  जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. या दुर्घटनेत एका मुलीचा बुडून मृत्यू झाला. तर कारमधील चार जण किरकोळ जखमी झाले.

थरकाप उडवणारी ही घटना बुधवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. मात्र, मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. सायंकाळची वेळ असल्याने वाहनांची वर्दळ होती, तसेच आजूबाजूला स्थानिक नागरिकही होते.

कार पाण्यात कोसळल्याचे पाहून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. नागरिकांनी पाण्यात उड्या घेऊन कारमधील चार जणांना तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्देवाने कारमधील एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीला बाहेर काढण्यात आलं. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता, डॉक्टरांनी मयत घोषित केलं.

Web Title: Accident Khadakwasla fell into the water of the dam. A girl drowned

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here