Home महाराष्ट्र Accident: भरधाव कार उभ्या ट्रॅक्टरवर धडकली; चार ठार

Accident: भरधाव कार उभ्या ट्रॅक्टरवर धडकली; चार ठार

Accident:या अपघातात कारमधील तिघे आणि ट्रॅक्टरजवळ उभा असणारा सफाई कामगार असे चार ठार.

Accident speeding car crashes into a standing tractor Four killed

शिंदखेडा  | नरडाणा | वर्षी शिरपूरहून : कानुमातेचा उत्सव साजरा केल्यानंतर नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. या अपघातात कारमधील तिघे आणि ट्रॅक्टरजवळ उभा असणारा सफाई कामगार असे चार ठार, तर दोघे जखमी झाले. ही घटना नरडाणा गावाजवळील गव्हाणे फाट्यावर सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. देवीदास धोंडू माळी (वय ५७, रा. सोनगीर, ता. धुळे), संदीप शिवाजी चव्हाण, त्यांची पत्नी मीना संदीप चव्हाण, गणेश छोटू चौधरी (सर्व रा. नाशिक) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

शिरपूर येथील दशरथ नाना कोळी यांच्या घरी कानुमातेचा उत्सव होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी एमएच ०२ डीएस १२७७ क्रमांकाची कार भरधाव वेगाने जात होती. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावाजवळ असलेल्या गव्हाणे फाट्यावर एमएच १८ एन ८३८२ क्रमांकाचे ट्रॅक्टर

नादुरुस्त असल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही कार ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. अपघात इतका जोरात घडला की कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात ट्रॅक्टरजवळ थांबलेले सोनगीर येथील सफाई कामगार देवीदास माळी यांच्यासह कारमधील संदीप चव्हाण, गणेश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप चव्हाण यांची पत्नी मीना चव्हाण यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. चव्हाण यांची मुलगी साक्षी हिच्यासह ४ वर्षांचा मुलगा. ६ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातील सर्व जखमींना तातडीने नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नरडाणा पोलिसांसह टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Web Title: Accident speeding car crashes into a standing tractor Four killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here