Home पुणे पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; तरुण गजाआड

पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; तरुण गजाआड

Pune Crime: नात्यातील पाच वर्षीय चिमुरडीवर तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार.

Sexual assault on a five-year-old girl Young man arrested

पुणे:  पुण्यातल्या कुंजीरवाडीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून नात्यातील पाच वर्षीय चिमुरडीवर तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. याप्रकरणी पीडितेच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यात २४ जुलै रोजी घडला.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम तरुण तक्रारदाराच्या मावस बहिणीचा मुलगा आहे. तक्रारदार महिलेने तिच्या पाच वर्षांच्या मुलीला मावशीकडे सोडले होते. आरोपी त्यांच्या घरी येत-जात होता. त्याने चिमुरडीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.

Web Title: Sexual assault on a five-year-old girl Young man arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here