Home संगमनेर संगमनेर शहरात ट्रक दुचाकीत भीषण अपघात, चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू- Accident

संगमनेर शहरात ट्रक दुचाकीत भीषण अपघात, चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू- Accident

Sangamner Accident news: संगमनेर शहरात ऐन नागपंचमी सणाच्या दिवशी महिलेचा अपघातात मृत्यू.

two-wheeler accident with a truck, unfortunate death of a woman after being found under the wheel

संगमनेर | प्रतिनिधी नवनाथ वावरे: ऐन नागपंचमी सणाच्या दिवशी दुर्दैवी घटना घडल्याने संगमनेर तालुक्यातील ओझर गावांसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.  संगमनेर शहरातील बसस्थानकासमोर गजबजीच्या ठिकाणी मागून येणाऱ्या ट्रकने वृध्द दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने ट्रकच्या चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पुरुष जखमी झाल्याची घटना घडली आहे. नागपंचमीच्या सकाळीच ही दुर्दैवी घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कारभारी शिंदे हे आपली पत्नी विमल कारभारी शिंदे (रा. ओझर, ता. संगमनेर) यांना घेऊन बँकेच्या कामासाठी संगमनेर येथे आलेले होते. बँकेतील काम आवरल्यानंतर ते आपल्या टि. व्ही. एस. कंपनीच्या लुना स्कुटर क्र. एम. एच. 17 बीएफ 7767) वरुन शहरातील बसस्थानकासमोरुन पुण्याच्या दिशेने जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रकने (क्र. एमएच 12 एफसी 5990) त्यांना पाठीमागून धडक दिल्याने तोल जावुन कारभारी शिंदे हे बाजूला पडले तर विमल शिंदे या ट्रकच्या बाजूने पडल्याने चाकाखाली चिरडल्या गेल्या. कारभारी शिंदे हे सुदैवाने दुसऱ्या बाजूला पडल्याने त्यांच्या हातापायांना खरचटले मात्र विमल शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तद दुचाकीचा चक्काचूर झाला.

अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी करत ट्रकचालकास पोलीसांच्या ताब्यात दिले. तर मृतदेह कॉटेज हॉस्पिटलला नेण्यात आला. गर्दिच्या ठिकाणी ट्रकचालकाने वाहनाच्या वेगावर नियंत्रण न ठेवल्याने अपघात झाल्याची प्रथमदर्शनींनी माहिती दिली. सकाळच्या वेळेस बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी असते यावेळी वाहतुक पोलीसांनी वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असते मात्र असा प्रकार दिसत नसल्याने छोटे मोठे अपघात रोजच घडत असतात. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे आज एका वृध्द महिलेस आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: two-wheeler accident with a truck, unfortunate death of a woman after being found under the wheel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here