Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून वेश्या व्यवसायास भाग पाडले

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून वेश्या व्यवसायास भाग पाडले

Shrirampur News: अल्पवयीन मुलीवर तिघा जणांनी अत्याचार (Sexually abused) करून तिला वेश्या व्यवसाय (Prostitution Business) करण्यास भाग पाडले. 

a minor girl was raped and forced into prostitution

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघा जणांनी अत्याचार (Rape) करून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चौघाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बजरंग चौक परिसरातील एका अल्पवयीन मुलीस मागील वर्षीच्या गणेशोत्सवाच्या काळात एका महिलेने आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी या अल्पवयीन मुलीस मारहाण करुन तिच्या आईला जिवे मारण्याचा धमकी देवून तिघा जणांनी आळीपाळीने तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. त्यानंतर चार पाच दिवसानंतर यातील आरोपींनी या अल्पवयीन मुलीस तिच्या इच्छेविरुध्द तिच्या आईच्या रखवालीतून तिचे अपहरण करत तिला एक़ा पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बळजबरीने पांढरी पुल येथील एका डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी नेले.

या ठिकाणचा वेश्या व्यवसाय बाबा चेंडवाल नावाचा व्यक्ती चालवत असतो. श्रीरामपुरातील या तिघा जणांनी या अल्पवयीन मुलीस बाबा चेंडवाल यांच्या ताब्यात देवून त्या बदल्यात पैसे घेवून वेश्या व्यवसायासाठी त्या अल्पवयीन मुलीस विकून टाकले. त्यानंतर मुल्ला कटर, पप्पू गोरे व व बाबा चेंडवाल यांनी शेवगाव येथे खोली भाड्याने घेवून या अल्पवयीन मुलीस बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले व तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्या पैशावर उदरनिर्वाह केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेतली असून पोलिसांनी सचिन उर्फ पप्पू गोरे, इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर व बाबा चेंडवाल यांचेविरुध्द भादंवि कलम 366(अ), 368, 370 (4) 370 (अ),(1), 372, 373, 376 (2)(एन) सह पोक्सो कायदा कलम 3, 4, 5 (जी) 6, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पांढरीपूल येथील बाबा चेंडवाल, एक महिला आरोपी यांना अटक (Arrested) केली आहे. याप्रकरणी पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप अधिक तपास करत आहेत.

Web Title: a minor girl was raped and forced into prostitution

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here