Home Accident News संगमनेर शहरात महिलेचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

संगमनेर शहरात महिलेचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Breaking News | Sangamner: मोपेडवरुन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ट्रकची धडक लागल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना. (Accident).

Accident woman was crushed under the wheels of a truck and died on the spot in Sangamner city

संगमनेर: संगमनेर शहरात मोपेडवरुन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ट्रकची धडक लागल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. नीतू सोमनाथ परदेशी असे या मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पुणे या शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ट्रकची धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात नीतू सोमनाथ परदेशी ही महिला ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. मयत महिला नेहरु चौकातील सोमनाथ परदेशी यांच्या पत्नी आहेत. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मालट्रक (क्र. एम. एच. 20/ ए 5858) बसस्थानकांकडून दिल्ली नाक्याकडे जात होता. हा मालट्रक छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाजवळ आला असता त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडत असताना नीतू सोमनाथ परदेशी (वय 37, रा. पानसरे गल्ली, नेहरु चौक) यांच्या मोपेडला या ट्रकची धडक बसली. त्यामुळे त्यांची मोपेड ट्रक खाली घुसली. अचानक घडलेल्या प्रकारानंतर ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र हा ट्रक काही अंतर पुढे गेल्याने पुढील चाकातून वाचलेल्या परदेशी पाठीमागील चाकाखाली सापडून चिरडल्या गेल्या.

या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी धाव घेत जखमी झालेल्या महिलेला तातडीने खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संगमनेर शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या महिलेचा अपघातात जीव ल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Accident woman was crushed under the wheels of a truck and died on the spot in Sangamner city

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here