Home अहमदनगर संगमनेर शहरात रस्त्याच्या कडेला झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

संगमनेर शहरात रस्त्याच्या कडेला झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Breaking News | Sangamner: रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका छोट्या झाडाला गळफास घेऊन एका 80 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना.

man committed suicide by hanging himself from a tree on the roadside in Sangamner city

संगमनेर:  संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील श्रमिक मंगल कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका छोट्या झाडाला गळफास घेऊन एका 80 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आज शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने  शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सयाजी नामदेव भुजबळ (रा. श्रीरामनगर, संगमनेर) असे या वृद्धाचे नाव आहे. आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास  ही घटना घडल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली.

पोलीसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होत सदर मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कॉटेज रुग्णालयात पाठविण्यात आला. मयत सयाजी भुजबळ हे शहरातील जुन्य बसस्थानकासमोरील दत्त मंदिराजवळ हार-फुलांचा व्यवसाय करत होते. त्यामुळे ते अनेकांशी परिचित होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title: man committed suicide by hanging himself from a tree on the roadside in Sangamner city

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here