Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन….

अहमदनगर ब्रेकिंग: पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन….

Breaking News | Ahmednagar: पतीचे अनैतिक संबध उघडकीस आल्याने पत्नीला लोखंडी गजाने केली मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल.

wife caught the husband in the wrong with another woman

अहमदनगर: बंद खोलीत पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडल्याने रागातून पतीने इतरांच्या मदतीने पत्नीला मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीवर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा झालेल्यामध्ये दाखल फिर्यादीच्या पतीसह त्याच्यासोबत पकडलेली महिला व तिच्या नातेवाईकांचा समावेश आहे. फिर्यादी या त्यांच्या पती व तीन मुलांसह नगर शहरातील उपनगरात राहतात.

त्यांनी सोमवारी (दि. ८) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत बंद खोलीमध्ये नको त्या अवस्थेत पकडले. त्याचा राग मनात धरून त्या महिलेने तिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकही घटनास्थळी आले व त्यांनी फिर्यादीला लोखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच पतीने देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी झालेल्या फिर्यादीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: wife caught the husband in the wrong with another woman

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here