अहमदनगर: दुकानावर मराठी पाट्या लावा नाही तर दंड भरायला तयार रहा
Breaking News | Ahmednagar: मराठीत (देवनागरी लिपीत) लावा अन्यथा एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल कामगार आयुक्तांकडून दुकानदारांना इशारा.
अहमदनगर : जिल्ह्यात २ लाख ४९ हजार हॉटेल, दुकाने आणि व्यापारी संस्था आहेत. या व्यावसायिक आणि औद्योगिक व्यवस्थापनांचे नामफलक मराठीत (देवनागरी लिपीत) लावा अन्यथा एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल, असा इशारा सहायक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी आस्थापना मालकांना दिला आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ अंतर्गत आस्थापनांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापना मालकांनी शासन आदेशाची अंमलबजावणी करणे
गरजेचे आहे. अधिनियम २०१७ अंतर्गत तरतुदीचे किंवा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित मालकांना एक लाखापर्यंत दंड भरावा लागेल. दंड ठोकूनही उल्लंघन सुरूच ठेवल्यास प्रत्येक दिवसासाठी दोन हजार रुपये दंड वसूल केला जाणार असल्याचा इशारा कवले यांनी दिला आहे.
Web Title: Fine up to one lakh for not putting up Marathi plates
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News