संगमनेर: निवृत्त मेजर कैलास दराडे यांचे अपघाती निधन
Sangamner: सेवानिवृत्त मेजर यांचा अपघात (Accidental)झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
संगमनेर: भारतीय सैन्यदलात १७ वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत्त झालेले मेजर कैलास हरिभाऊ दराडे (वय ३८) यांचे अपघाती निधन झाले. संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात मानवंदना देऊन त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या जनसमुदायाने भारत मातेच्या या वीर सुपुत्राला निरोप दिला.
मेजर कैलास दराडे यांनी सैन्यात असताना जम्मू- कश्मीर, आसाम, राजस्थान, दिल्ली, पंजाब, पुणे, त्रिपुरा व नगर येथे कर्तव्य बजावले. काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. त्यामुळे संगमनेर व नंतर पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे अखेर त्याची प्राणज्योत मावळली.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्याच्यावर प्रतापपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेजर कैलास दराडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.
Web Title: Accidental death of retired Major Kailas Darade
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App