Home अहमदनगर Ahmednagar:  आमच्या सोबत बोलली नाही तर तुझ्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकू, मुलीला धमकी

Ahmednagar:  आमच्या सोबत बोलली नाही तर तुझ्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकू, मुलीला धमकी

Ahmednagar Crime:  पाच तरूणांनी अल्पवयीन मुलीची छेड, तुला आमच्या सोबत बोलावे लागणार, नाही बोलली तर तुझ्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकू, अशी धमकी.

Crime you don't talk to us, we will throw acid on your face, girl threat

अहमदनगर:  नगर शहरात भांडेकरू म्हणून राहणार्‍या पाच तरूणांनी अल्पवयीन मुलीची छेड काढली. आमच्या सोबत बोलली नाही तर तुझ्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकू, अशी धमकी दिल्याची घटना नगर शहरात घडली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस गावडे, पशुराम काकडे, सिध्देश्‍वर काकडे, वैभव काकडे, अमोल चाळगे यांच्याविरूध्द भादंवि 354, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी फिर्यादीचे आई-वडिल घरी नसताना तेजस गावडे याने मोबाईलवर मेसेज केला.

घराचा दरवाजा वाजवून बाहेर येण्यासाठी आवाज दिला. दरवाजा उघडला नाही तर आम्ही दरवाजा तोडून आत येऊ, तुला आमच्या सोबत बोलावे लागणार, नाही बोलली तर तुझ्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान पीडिताने घडलेली घटना आई-वडिलांना सांगितल्यानंतर 29 डिसेंबर रोजी पाच तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime you don’t talk to us, we will throw acid on your face, girl threat

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here