अकोले ब्रेकिंग: पती-पत्नीचा बुडून मृत्यू- Ahmednagar
Ahmednagar, Akole Rajur News: पाणी आणण्यासाठी गेलेल्या आणि एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना दोघांचा बुडून मृत्यू (Drowned), अकोले तालुक्यातील विहीर येथील घटना.
राजूर: पाणी आणण्यासाठी गेलेल्या आणि एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना अकोले तालुक्यातील विहीर येथे गुरुवार दि. २९ रोजी घडली.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान बाळू दुनदा नाडेकर (वय ४२) पार्वतीबाई बाळू नाडेकर (वय ४०) हे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. यापैकी कोणाचा तरी एकाचा पाय घसरला व तो विहिरीत पडला, त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने विहिरीत उडी घेतली असावी व एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नांत दोघेही बुझ्न मृत्युमुखी पडले. आपले आई-वडील घरी का आले नाहीत? याचा शोध त्यांचा मुलगा घेऊ लागल्यानंतर त्या दोघांची शोधाशोध झाली. अखेर विहिरीच्या कडेला पाण्याची भांडी दिसल्यानंतर शोध घेतला असता दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे समजले.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
मयत बाळू यांचा भाऊ काळू नाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राजूर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. दरम्यान पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
Web Title: Drowned of husband and wife Death
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App