Home क्राईम महिला रिक्षाचालकावर प्रवाशाकडून बलात्काराचा प्रयत्न, रात्रीच्या वेळी घाटात घडला प्रकार

महिला रिक्षाचालकावर प्रवाशाकडून बलात्काराचा प्रयत्न, रात्रीच्या वेळी घाटात घडला प्रकार

Pune Crime News:  कात्रज घाटात महिला रिक्षाचालकावर प्रवाशाकडून बलात्काराचा (Rape) प्रयत्न, संपूर्ण कपडे काढून नग्न अवस्थेत या महिलेचा कात्रज घाटात पाठलाग करीत शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा दाखल, ३० वर्षीय युवकास अटक.

Female rickshaw puller attempted to be rape by a passenger

पुणे: पुण्यात महिला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीने रिक्षाचालक असलेल्या महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील कात्रज घाटात ही घटना घडली आहे. निखिल अशोक मेमजादे असं तीस वर्षीय अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचं आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

रिक्षाचालक महिलेने आरोपीला विरोध केला असता त्याने संपूर्ण कपडे काढून नग्न अवस्थेत या महिलेचा कात्रज घाटात पाठलाग केला. कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजता हा सगळा प्रकार घडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिला रिक्षाचालकाने तक्रार दिली आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला या रिक्षाचालक आहेत. 26 रोजी आरोपी रात्री आरोपी कात्रज घाटात जायचे आहे, असे सांगत रिक्षात बसला. कात्रज घाटातील एका लॉजिंगजवळ रिक्षा थांबवून त्याने महिला चालक यांना जेवणासाठी जबरदस्ती केली. मात्र या महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करत तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. एवढंच नाही तर या प्रवाशाने स्व:तचे सगळे काढून तो नग्न अवस्थेत रिक्षात बसला. महिलेला हा सगळा प्रकार खटकला आणि तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निर्लज्ज पुरुषाने भर रस्त्यात नग्नावस्थेत तिचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेने स्वत:चा बचाव केला. या संदर्भात महिलेने पोलिसांत धाव घेतली घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.

Web Title: Female rickshaw puller attempted to be rape by a passenger

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here