Crime News: ठाकरे गटाच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात भीतीचं वातावरण
Pune Crime News: पुण्यातील वानवडी येथील घटना. ठाकरे गटाच्या कार्यालयावर गोळीबार (Firing).
पुणे: वानवडीतील ठाकरे गटाच्या कार्यालयावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष इम्तियाज अफजल हुसेन शेख यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे. ‘यहा के भाई लोग हम हैं, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,” म्हणत आरोपींना हा गोळीबार केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील वानवडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पूर्ववैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणवणार्याने हातात पिस्तुल घेऊन गोळीबार केला आहे. मुख्य रस्त्यावर येऊन हातात पिस्तुल घेऊन यातील एकाने ‘यहा के भाई लोग हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,” असे बोलून पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत निर्माण केली. इम्तियाज अफजल हुसेन शेख या 37 वर्षीय यांनी या बाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
अतिक शेख, सादिक शेख, हुसेन कादिरी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचा भाऊ इम्रान आणि सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात 27 डिसेंबरला भांडणं झाली होती. या भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी कार्यालयाच्या दारावर लाथाबुक्क्या मारल्या. त्यानंतर रागातूनच हवेत गोळीबार केला. ठाकरे गटाच्या कार्यलयावर गोळीबार झाल्याने ठाकरे गट आक्रमक भूमिका घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Web Title: Firing at office of Thackeray group
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App