Home क्राईम संगमनेर पोलीस ठाण्याच्या कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

संगमनेर पोलीस ठाण्याच्या कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Accused attempted suicide in Sangamner police station jail

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर पोलीस ठाण्याच्या कारागृहात चोरीच्या आरोपात अटक असलेल्या योगेश सीताराम पाटेकर वय २० वडळा महादेव श्रीरामपूर याने शुक्रवारी मध्यरात्री कारागृहात टोकदार वस्तूने वार करत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला.

कोठडीतील अन्य आरोपी व सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. तो जखमी झाल्याने त्याला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल आनंदा भांगरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी योगेश पाटेकर याच्यावर आत्महत्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक निकिता महाले करीत आहे.

Web Title: Accused attempted suicide in Sangamner police station jail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here