Home अहमदनगर तरूणीवर अत्याचार करत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

तरूणीवर अत्याचार करत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

Photo of sexual abuse a young girl threatens to go viral on social media

अहमदनगर |Ahmednagar:  तरूणीवर अत्याचार करत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी (Ransom) करणार्‍या तरूणाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार (Sexual abuse), खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप आण्णासाहेब पंडीत (रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी) असे गुन्हा दाखल (Crime Filed)झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत नगर तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या तरूणीने फिर्याद दाखल केली आहे.

23 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान अहमदनगर- कल्याण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी काल रविवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी तरूणी व प्रदीप पंडीत हे दोघे नागापूर एमआयडीसीत कंपनीमध्ये कामाला होते. त्यांच्यामध्ये ओळख होती. 23 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्रदीपने फिर्यादी तरूणीला फोन करून अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकात बोलून घेतले. मैत्रिणीकडे चालले असे घरी सांगून फिर्यादी तरूणी स्टेट बँक चौकात गेली. तरूणी तेथे जाताच प्रदीपने तिला गाडीवर बसून अहमदनगर-कल्याण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे प्रदीपने एका रूममध्ये फिर्यादी तरूणीवर बळजबरीने अतिप्रसंग केला.

या घडलेल्या घटनेनंतर 15 दिवसांनी प्रदीपने कंपनीचे काम सोडले व तो गावी देवळाली प्रवरा येथे गेला. त्यानंतर त्याने फिर्यादी तरूणीला फोन करून, ‘खात्यावर पैसे टाक, नाहीतर मी तुझी बदनामी करेल’, असे म्हणून पैशाची मागणी केली. फिर्यादी तरूणीने प्रदीपला पाच ते सहा वेळेस कधी 500 ते कधी एक हजार रूपये असे पैसे पाठविले. यानंतर पैसे पाठविणे बंद केल्याने प्रदीपने फिर्यादी तरूणीचे फोटो व्हॉट्सअपद्वारे स्टेटसला व्हायरल करण्याची धमकी देत  खंडणी (Ransom) मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

Web Title: Photo of sexual abuse a young girl threatens to go viral on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here