Fire: अहमदनगर जिल्ह्यात या कंपनीला आग
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर-दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या भंगाराला रविवारी दुपारी अचानक आग (Fire) लागून मोठे नुकसान झाले आहे.
महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कंपनीतील भंगार साहित्य टाकलेले आहे. यामध्ये प्लॅस्टिक व इतर साहित्यांचा समावेश आहे. याच साहित्याला रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली.
याची माहिती महापालिका अग्निशमन विभागाला देण्यात आली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाने दोन गाड्या आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. आगीमध्ये कंपनीच्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Web Title: company caught fire in Ahmednagar