Home अहमदनगर Accident: दुचाकीच्या धडकेत सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर ठार

Accident: दुचाकीच्या धडकेत सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर ठार

Retired laboratory attendant killed in two-wheeler collision Accident

Accident | राहाता | Rahata: रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने जोराची धडक दिल्याने श्रीगणेश विद्या प्रसारकमधील सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर गणपत दामोधर शेलार (वय 62) यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात (Accident) शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर नगर-मनमाड हायवेवर झाला उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले..

शेलार हे बागडे वस्ती भागात राहतात. ते 10 एप्रिल रोजी नवनाथ मंदिराकडून घराकडे जात असताना नगर मनमाड रोड पायी ओलांडताना बाभळेश्वरकडून शिर्डीकडे जाणार्‍या मोटारसायकल (एमएच 17 सीएस 5901) यावरील चालक दत्तात्रय भाऊसाहेब इंगळे, रा. साकुरी ता. राहाता याने जोराची धडक दिल्याने शेलार गंभीर जखमी झाले. ते साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे उपचार घेत असताना 11 एप्रिल रोजी रात्री 12.43 वाजता मयत झाले.

याप्रकरणी त्यांच्या मुलने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार दत्तात्रय इंगळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यू 26/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. अकस्मात मृत्युच्या तपासातून उघड झाल्याने पुढे गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉ. दिलीप तुपे हे करत आहेत.

Web Title: Retired laboratory attendant killed in two-wheeler collision Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here