Home क्राईम भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Rape case filed against BJP MLA Ganesh Naik

BJP Ganesh Naik:  भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात आता भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात याआधीच मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला तसेच आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा, आरोप या  महिलेने केला होता.  शनिवारी गणेश नाईक यांच्याविरोधात 2010 ते 2017 दरम्यान पीडितेवर शारीरिक आणि मानसिक शोषण (Physical and mental abuse)करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मार्च 2021 मध्ये सीबीडी येथील गणेश नाईक यांच्या कार्यालयात स्वत: कडील रिव्हॅालव्हर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप करत संबंधित महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याने गणेश नाईक यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

Web Title: Rape case filed against BJP MLA Ganesh Naik

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here