Home अहमदनगर Accident: वायररोप तुटून विहिरीत पडून शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

Accident: वायररोप तुटून विहिरीत पडून शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

Accident death of a farmer when a wire rope broke and fell into a well

Kopargaon Accident | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील नऊ चारी परिसरात विद्युत मोटर  विहिरीत सोडत असताना वायररोप तुटून शेतकरी वाल्मीक कोंडाजी होन (वय 51) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहेसदर अपघात  रविवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान वाल्मीक होन यांनी मजुरांना बरोबर घेत नऊचारी परिसरातील आपल्या शेतीमध्ये असलेल्या विहिरीवर  विद्युत मोटर टाकण्यासाठी गेले असता ही घटना घडली.

सध्या गोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन सुटले  असून परिसरातील नऊ चारीला देखील पाणी आले आहे. चारीला पाणी आल्यानंतर होन यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढते. त्यामुळेच त्यांनी या विहिरीवर विद्युत मोटर बसवण्याचे ठरवले. ट्रॅक्टरच्या साह्याने मजुरांना सोबत घेत ते या विहिरीत मोटर सोडत असताना विद्युत मोटरीचा पाईप तुटला गेला. पाईप तुटल्यामुळे मोटरला हीसका बसून पाण्यात अतिवेगाने गेली त्याचबरोबर होन यांच्या हातात असलेला वायररोपने आढी मारली त्या क्षणी ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्यामुळे होन यांचा दुर्दैवी मृत्यू  झाला. होन यांना वाचविण्यासाठी मजुरांनी प्रयत्न केले मात्र ते असफल ठरले.

घडलेल्या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला कळवली.कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

Web Title: Accident death of a farmer when a wire rope broke and fell into a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here