Home अहमदनगर अहमदनगर: अश्लील व्हिडियो सोशियल मेडीयावर प्रसारित करणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर: अश्लील व्हिडियो सोशियल मेडीयावर प्रसारित करणाऱ्या आरोपीस अटक

Accused of broadcasting pornographic videos on social media arrested

Ahmednagar | Nevasa | नेवासे: नेवासे शहरातील मुस्लीम समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करून गेल्या दोन महिन्यापूर्वी नेवासा शहरात अश्लील व्हिडियो सोशियल मेडीयावर प्रसारित (Pornographic videos spread on social media) करून बदनामी करण्याची घटना उघडकीस आली होती.

या घटनेचा तपास नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पोलीस पथकाने सायबर सेलची मदत घेऊन घटनेचा सखोल तपास करीत गणेशपेठ पुणे येथून अटक करण्यात आली आहे.

नेवासे शहरातील सामाजिक कार्यकर्ते पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करत गेल्या दोन महिन्यापूर्वी पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर कारत नेवासे शहरात टवाळी करत अश्लील व्हिडियो प्रसारित करून बदनामी केलेली होती. याबाबत पठाण यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल केला होता.

नेवासा पोलीस पथक व सायबर सेलची मदत घेत गणेशपेठ पुणे येथून निखील रविकिरण पोतदार याला अटक केली असून आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.    

Web Title: Accused of broadcasting pornographic videos on social media arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here