Home Suicide News धक्कादायक: दोन सख्ख्या बहिणींची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

धक्कादायक: दोन सख्ख्या बहिणींची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Beed Two sisters commit suicide by jumping into a well

बीड | Beed: अंबाजोगाई शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या परिसरातील एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.

 निदा अल्ताफ शेख वय 16 आणि सानिया अल्ताफ शेख वय 18 अशी आत्महत्या केलेल्या बहिणीची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, निदा आणि सानिया या अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या. सकाळी वडीलांनी त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. मात्र अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवर असणाऱ्या, कंपनी बागेतील विहिरीत, काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान, निदा आणि सानिया या दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. या दोघींनी आत्महत्या केल्याचे अंबाजोगाई शहर पोलीसांच्या तपासात रात्री स्पष्ट झाले. मात्र त्यांनी आत्महत्या का केली?  या मागील कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Beed Two sisters commit suicide by jumping into a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here