Home Suicide News अहमदनगर: विषारी औषध प्राशन करून भावास फोन करून केला फोन बंद अन...

अहमदनगर: विषारी औषध प्राशन करून भावास फोन करून केला फोन बंद अन तो ही

Nevasa Young man commits suicide by going to his own field

पैठण | Nevasa: एका २० वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे शुक्रवारी ता. ४ सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे, तुषार बंडू डुकरे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  विहामांडवा येथील तुषार डुकरे हा युवक शुक्रवारी सकाळी आठ वाजता घरातून स्वतःच्या असलेल्या विहामांडवा शिवारातील शेतातील गट नंबर ५२ मध्ये उसाची लागवडीसाठी गेला होता. परंतु तुषारने त्याच्या चुलत भाऊ प्रदीप डुकरे याला नऊ वाजेच्या दरम्यान फोन करून विषारी औषध प्राशन केल्याचे सांगून त्याने फोन बंद करुन ठेवला.

त्यानंतर घाबरलेल्या प्रदीपने गावातील व्यंकटेशला फोन करून तुषारने विषारी औषध घेतल्याचे सांगून घटनास्थळी लवकर जाण्याचे सांगितले. तोपर्यंत उशीर झाला होता. कारण तुषार हा औषध प्राशन केलेल्या अवस्थेत तो जमिनीवर पडलेला दिसताच त्याला तातडीने पाचोड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयत दाखल करण्यात आले.

मात्र वैद्यकीय अधिकारी डाँ.शिवाजी पवार यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. तसेच त्याची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मात्र त्याच्या आत्महत्या मागील कारण समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहे या घटनेचे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Nevasa Young man commits suicide by going to his own field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here