Home मनोरंजन Kishori Shahane: अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा अपघात

Kishori Shahane: अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा अपघात

Actress Kishori Shahane's car accident

Kishori Shahane : मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा अपघात (Accident) झाल्याची घटना पुण्यातील मावळमध्ये घडली. या अपघातातून त्या सुखरुप बचावल्या आहेत. यानंतर याबाबत किशोरी शहाणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

अपघातानंतर किशोरी शहाणेंनी भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्ट मध्ये लिहिले आहे की,  “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचला आहे. देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई”.

किशोरी शहाणे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारचा मावळ मध्ये अपघात झाला आहे. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत सहानुभूती व्यक्त करत आहे.

Web Title: Actress Kishori Shahane’s car accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here