Home Accident News जेजुरीला चाललेल्या भाविकांच्या गाडीला कंटेनर आदळून अपघात, ९ जण जखमी

जेजुरीला चाललेल्या भाविकांच्या गाडीला कंटेनर आदळून अपघात, ९ जण जखमी

Ahmednagar Accident container collided with a vehicle carrying devotees to Jejuri

अहमदनगर | Ahmednagar News: जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या नगर तालुक्यातील खडकी येथील भाविकांच्या दोन वाहनांवर कंटेनर आदळून झालेल्या विचित्र अपघातात ९ जण जखमी (injured) झाल्याची घटना घडली आहे.  यामधील पाच जण गंभीर आहेत.

सुपे-मोरगाव मार्गावर बारामती तालुक्यातील सुपे गावाजवळ हा अपघात (Accident) झाला.  काजल विठ्ठल कोकरे, नाथा सतीश रोकडे, अंबादास भाऊसाहेब रोकडे, नवनाथ रोकडे, विठ्ठल शिवाजी कोकरे (सर्व रा.खडकी ता.नगर) हे जखमी झाले आहेत.

नगर तालुक्यातील खडकी येथील भाविक जेजुरीला देवदर्शनासाठी दोन मोटारींमधून महिला-मुलांसह १४ जण प्रवास करत होते.

सुप्यात चहा घेऊन गाडीत बसत असतानाच पाठीमागील उतारावरून वळणावर एक कंटेनर उलटून घसरत सुमारे ३०-४० फुटांवर थांबलेल्या या गाड्यांवर आदळला.

काही क्ष्णार्धात्त झालेल्या या अपघातात गाडीत बसलेले व बसत असलेले सर्वजण जखमी झाले. कंटनेरच्या धडकेने दोन गाड्यांमधील एक गाडी रस्त्याच्या विरूद्ध बाजुला सुमारे अडिचशे फुटांवर असलेल्या चहाच्या हॉटेल जवळ जाऊन थांबली. सुदैवाने हॉटेल बाहेर ग्राहक नव्हते व रस्त्यावर अन्य वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात हॉटेलचे देखील नुकसान झाले. या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला आहे.

Web Title: Ahmednagar Accident container collided with a vehicle carrying devotees to Jejuri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here