Home Accident News दोन दुचाकीस्वरात भीषण अपघात, नगरसेविकेच्या पतीचा मृत्यू

दोन दुचाकीस्वरात भीषण अपघात, नगरसेविकेच्या पतीचा मृत्यू

Parner accident involving two-wheeler, death of corporate husband

पारनेर | Parner Accident: पारनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. पारनेर नगरपंचायतीच्या मावळत्या नगरसेविका नंदाताई साहेबराव देशमाने यांचे पती साहेबराव देशमाने यांचे पारनेर – सुपे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास अपघातात दुर्दवी निधन झालायची घटना घडली आहे.  या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  साहेबराव पिंपळगांव कौडा ता. नगर येथून दुचाकीवरून पारनेकडे परतत होते. पारनेरला पोहचण्यास अवघ्या दिड किलोमिटरचे अंतर राहिलेले असताना शाहीर भास्कर गायकवाड यांच्या वस्तीजवळ त्यांच्या दुचाकीस भीषण अपघात झाला.

समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात साहेबराव यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यातच त्यांचे दुर्देवी निधन झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार अपघातानंतर परीसरातील नागरीकांना साहेबराव यांना तात्काळ पारनेरच्या ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचे दुर्देवी निधन झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.

Web Title: Parner accident involving two-wheeler, death of corporate husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here