वाहनांची अफरातफर करणारा आरोपी जेरबंद, अडीच कोटींच्या कार जप्त
अहमदनगर: एका टूर आणि ट्रॅव्हल्सकंपनीकडून वाहने भाड्याने चालविण्यासाठी घेऊन सदरची वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणारा आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. त्याच्याकडून २ कोटी ६९ लाख रुपये किमतीच्या १६ अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.
या प्रकरणात सध्या एकच आरोपी असून अजून मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शशिकांत उर्फ दादा मारुती सातपुते ता. पारनेर असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महेश प्रताप खोबरे वय ४० रा. पुणे याचा टूर आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. आरोपी दादा सातपुते याने फिर्यादीकडून मार्च २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान इतीका , झेस्ट अशा एकूण २२ कार भाड्याने चालविण्यासाठी घेतल्या त्यापैकी ९ कार आरोपीने फिर्यादीस परत केल्या मात्र उर्वरित १३ कारचे भाडे व कार परत केल्या नाही. तसेच या कारबाबत काही एक माहिती न दिल्याने फिर्यादीने सुपा पोलीस ठाण्यात सातपुते याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अनिल कटके यांच्याकडे हस्तांतरित केला आणि तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार त्यांच्या पथकाने आरोपीस जेरबंद केले.
Web Title: Ahmednagar Accused of embezzling vehicles arrested