Indorikar Maharaj: इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा, खटला रद्द
संगमनेर | Indorikar Maharaj: समाजप्रबोधनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात खटला दाखल होता. याबाबत संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने खटला रद्द ठरविला आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इंदोरीकर महाराजांचे वकील म्हणून के.डी. धुमाळ हे काम पाहत होते. इंदोरीकर महाराजविरोधात फिर्याद दाखल करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणारे वकील बी.जी. कोल्हे यांनी या खटल्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आज न्यायालयाने निकाल देत खटला रद्द केला आहे. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून एकच जल्लोष केला आहे.
Web Title: Sangamner Great relief to Indorikar Maharaj