Home अहमदनगर जाब विचारल्याच्या रागातून मायलेकास मारहाण

जाब विचारल्याच्या रागातून मायलेकास मारहाण

Ahmednagar beats Milekas out of anger

अहमदनगर | Ahmednagar: बोल्हेगाव फाटा येथे रेणुकानगर मधील सागर हौसिंग सोसायटी येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घरासमोर उभे असताना तुझा भाऊ मेला असे सांगून चिडवील्याने त्याचा जाब विचारल्यावर मायालेकास शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने डोके फोडण्याची घटना घडली आहे.

रमेश शेळके, विकास रमेश शेळके व सुनीता रमेश शेळके यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमल बाबसाहेब हापसे या सकाळी पिंपरी बाभळेश्वर गावाहून आल्या होत्या. मुलगा दीपकसह घरासमोर उभ्या असताना रमेश शेळके त्यांचा मुलगा व पत्नी हे मोठ्याने हसू लागले. आता हिचा भाऊ मेला हिला कोणाचा आधार नाही असे  म्हटल्यावर दीपक हापसे यास राग आला. त्याने याबाबत जाब विचारला. यावेळी रमेश सह पत्नी व त्याचा मुलगा यांनी शिवीगाळ केली. त्यांच्यात बाचाबाची झाली. धक्काबुकी करण्यात आली. त्यांना समजावून सांगत असताना रमेश शेळके याने फेकून मारलेला दगड विमल हापसे यांच्या डोक्याला लागून डोके फुटले. हापसे व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणातील शेळके या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Ahmednagar beats Milekas out of anger

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here