संगमनेरात तरुणास तलवार काढून दमबाजी, मारहाण, सोन्याची चैन लंपास
संगमनेर | Sangamner: पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, दमबाजी करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची घटना शहरातील चैतन्यनगर येथे घडली.
ही घटना बुधवारी चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील प्रकाश शेटे याने धीरज पावडे, आकाश पावडे, व निलेश काथे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या कारणावरून निलेश काथे याने तलवार काढून वैष्णव राजकुमार मुर्तडक वय २९ रा, चैतन्यनगर यास दमबाजी केली. याप्रसंगी तेथे उभे असलेल्या शेटे यास दोघानी मारहाण केली. एकाने वैष्णव याच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून त्याला धमकी दिली.
याबाबत वैष्णव मुर्तडक शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी धीरज पावडे रा. राहणे मळा, निलेश काथे रा. इंदिरानगर, नागेश भांगरे रा. अभंग मळा, गोकुळ घाडगे रा. मालदाड रोड या चौघांविरोधात गु,र.नं. २१३/२०२१ नुसार भा. द. वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner young man drew his sword and was beaten and chained to a gold