Home संगमनेर संगमनेरात ऑक्सिजनचे दोन टँकर दाखल, तालुक्यात १६९९ अॅक्टिव रुग्ण

संगमनेरात ऑक्सिजनचे दोन टँकर दाखल, तालुक्यात १६९९ अॅक्टिव रुग्ण

Sangamner Taluka 1699 Active Patient Corona

संगमनेर | Sangamner: संगमनेरात ऑक्सिजन टंचाई गंभीर परिस्थिती निर्माण होण्याअगोदरच दोन ऑक्सिजनचे टँकर चाकण येथून दाखल झाल्याने कोरोना रुग्ण व नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संगमनेरात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. काही तास पुरेल इतकाच साठा शिल्लक होता. या सर्व परिस्थितीवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात होते. संगमनेरातील रुग्णालयांना लवकरात लवकर ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील होते. तर ऑक्सिजनचे टँकर संगमनेरात दाखल झाल्याने मोठा दिलासा तालुक्याला मिळाला आहे. सध्या तरी इंजेक्शनचा तुटवडा नसल्याने संगमनेरातील आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढण्यास यशस्वी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संगमनेर तालुक्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात एकूण मिळून दररोज सात मेट्रिक टन इतका ऑक्सिजन लागतो. चाकण येथील दोन कंपन्यांमधून ऑक्सिजन पुरावठा केला जातो. आज दोन टँकर दाखल झाले आहेत.  

दरम्यान संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत २१७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या १६९९ अॅक्टिव रुग्ण आहेत. तर आज २७६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Web Title: Sangamner Taluka 1699 Active Patient Corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here