Home अहमदनगर भाजीविक्रेत्याची पोलीस अधिकाऱ्यासोबत अरेरावी, दोघांवर गुन्हा दाखल

भाजीविक्रेत्याची पोलीस अधिकाऱ्यासोबत अरेरावी, दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar vegetable seller is arguing with the police officer

अहमदनगर | Ahmednagar: सद्यस्थितीत कोरोनाची महामारी सुरु आहे. लॉकडाऊन सुरु आहे. घरोघरी जाऊन भाजी विकण्यास परवानगी आहे.

एका जागेवर भाजी विकून गर्दी करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याचाच राग येऊन सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी यांच्यावर आरडाओरडा करत धमकी देण्यात आली.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघा भाजी विक्रेत्यांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकजवळ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांना बरेचसे भाजी विक्रेते एका जागेवर बसून भाजी विकत असल्याने नागरिकांची गर्दी झाल्याचे समजले. त्यामुळे निरीक्षक सुरसे यांच्या सह हवालदार यांचे पथक गस्त घालत होते. रस्त्यावर भाजी विक्रेते एका ठिकाणी बसून विक्री करत असल्याने ग्राहकांची गर्दी झाली होती. सर्व विक्रेत्यांना जिल्हाधिकारी आदेशबाबत माईकद्वारे सांगितले असता सर्व विक्रेते तेथून निघून गेले. मात्र फ्रेश मंडई जवळ रस्त्यालगत भाजीपाला ठेऊन दोन इसम विक्री करताना दिसले. तेथे गर्दी झाली होती. जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड पावती भरून घेण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन आरडाओरडा करून तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संदीप सुर्यकांत बोरुडे सुमित सुर्यकांत बोरुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Web Title: Ahmednagar vegetable seller is arguing with the police officer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here