अहमदनगर ब्रेकिंग: बस कंडक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
Ahmednagar News: पुणे-शिवाजीनगर ते शिर्डी ही एसटी महामंडळाची बस घेऊन आलेल्या एसटी कंडक्टरने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
शिर्डी | Shirdi: पुणे-शिवाजीनगर ते शिर्डी ही एसटी महामंडळाची बस घेऊन आलेल्या एसटी कंडक्टरने 11 मार्च 2023 रोजी पहाटे निमगाव कोर्हाळे शिवारातील एका वस्तीलगत काटवणात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरुण अर्जुन सस्ते (वय 40) असे या कंडक्टरचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेने शिर्डी शहरात खळबळ उडाली असून परिवहन महामंडळाच्या कंडक्टरने कर्तव्यावर असताना इतक्या टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या आत्महत्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ करीत आहे.
Web Title: Ahmednagar Bus conductor commits suicide by hanging himself
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App