धक्कादायक! खदानीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या
प्रेमसंबंधाला नातेवाइकांनी विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने १५० फूट खदानीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.
मुंबई : प्रेमसंबंधाला नातेवाइकांनी विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने १५० फूट खदानीत उडी घेऊन आपले जीवन संपविले. वैशाली गोवारे (१५) आणि आकाश जाठे (२१) अशी मृतांची नावे आहेत.
वैशाली ही महाविद्यालयात शिकत होती, तर आकाश सफाई कर्मचारी होता. हे दोघे जानुपाडा या आदिवासी पाड्यातील पाटाचे पाणी या ठिकाणी राहत होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दूरच्या नात्यातून ते दोघे भाऊ- बहीण असल्याने त्यांच्या प्रेमाला आकाशच्या घरातून विरोध झाला. यामुळे दोघेही निराश होते. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता आकाश स्वच्छतागृहात जातो असे सांगून घराबाहेर पडला आणि बराच वेळ झाला परतला नाही. तर वैशालीही घरातून अचानक गायब झाली. तिने मोबाइलही बरोबर नेला नव्हता.
Web Title: Lovers committed suicide by jumping into the quarry
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App