Home अहमदनगर अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक कोठारी यांच्यावर गुन्हा

अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक कोठारी यांच्यावर गुन्हा

Ahmednagar Crime against Kothari, current director of Ahmednagar Urban Bank 

अहमदनगर |Crime News | Ahmednagar:  कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बायोडिझेलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक अनिल चंदूलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर), राजधारी रामकिशोर यादव (रा. उत्तरप्रदेश) आणि श्रीकांत दत्तात्रय खोरे (रा. मुळेवाडी ता. कर्जत) असे गुन्हा (Crime) दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार अनिल कोठारी याच्या डांबर मिक्सिंग प्लॉटच्या वाहनांमध्ये बायोडिझेल इंधन म्हणून वापरले जात होते. या टँकर सोबत असलेल्या पावतीवर सिल्वासा ते अहमदनगर असा पत्ता होता. आरोपीच्या जबाबानुसार या बायोडिझेलचा वापर डंपर आणि इतर वाहनांना इंधन म्हणून वापरला जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Crime against Kothari, current director of Ahmednagar Urban Bank 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here