Home अहमदनगर जिल्ह्यात नायझेरियाहून आलेले मायलेक करोना पॉझिटीव्ह

जिल्ह्यात नायझेरियाहून आलेले मायलेक करोना पॉझिटीव्ह

Corona News Shrirampur Two Corona Positive Foreigner 

श्रीरामपूर |Ahmednagar Corona News | Shrirampur: नायजेरिया येथून श्रीरामपूर शहरात दाखल झालेले दोन प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

त्यांच्यावर  श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघांचेही सॅम्पल ओमियोक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.

नायझेरियाहून आलेली ४०  वर्षीय आई व तिचा ६  वर्षाचा मुलगा हे दोघे श्रीरामपूर येथे शहरातील शिवाजीरोड परिसरात आले. १५ डिसेंबर रोजी हे दोघे शहरात आले होते.  याबाबतची माहिती वैद्यकीय विभागास मिळताच त्यांनी या दोघांची करोना चाचणी केली असता या दोघांचेही अहवाल करोना पॉझिटीव्ह आले. त्यानुसार या दोघांनाही उपचारासाठी श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या काळात या दोन रुग्णांचा ज्या ज्या नातेवाईक अथवा व्यक्तींशी संपर्क आला त्या सर्वांचीही करोना तपासणी करण्यात आली असता या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरातच विलागीकरणात राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

या दोघा मायलेकांची ओमियोक्रॉन सॅम्पल तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती श्रीमती देशमुख यांनी दिली. परदेशातून आतापर्यंत 35 जण श्रीरामपुरात आले आहेत. या सर्वांची तपासणी केली असता परदेशातून आलेल्या व्यक्ती व त्यांचे नातेवाईक निगेटीव्ह आढळून आले आहेत. यातील एकाचा चुकीचा मोबाईल नंबर व पत्ता असल्यामुळे त्याचा शोध लागत नाही. ही व्यक्ती दुबई येथून आली असून त्याचा लवकरात लवकर शोध घेण्यात येणार असल्याचेही श्रीमती देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Corona News Shrirampur Two Corona Positive Foreigner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here