Home अकोले अकोले नगरपंचायतसाठी दुपारी एक वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

अकोले नगरपंचायतसाठी दुपारी एक वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

Akole nagar panchayat Election Voting 

अकोले| Akole Nagarpanchayat Election: ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात प्रथमच नगर जिल्ह्यातील अकोले , पारनेर  आणि कर्जत नगरपंचायतींसाठी  आज मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अकोले नगरपंचायतीसाठी दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे ३५ टक्के मतदान झाले आहे.

अकोले नगरपंचायत निवडणुकीत 13 जागांसाठी 44 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले असून काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढत आहे. भाजप स्वतंत्र लढा देत आहे. राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती असली तरी या दोन्हीही पक्षांचे अनेक बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात बहुरंगी लढत होत असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या २२  डिसेंबरला निकाल लागणार आहे. 

Web Title: Akole nagar panchayat Election Voting 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here