टीईटी पेपरफुटी प्रकरणी संगमनेरमधील शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यास अटक
संगमनेर | Sangamner: टीईटी पेपरफुटी गैरव्यवहारात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलीसांनी पहाटे संगमनेरात धडक देत सुखदेव डेरे यास अटक करण्यात आली आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. टीईडी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखरेदवडेरे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंगळुरुमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखालाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. .या कारवाईमुळे आणखी मोठ्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुखरेदव ढेरे यांना संगमनेर येथून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर बंगळुरू येथून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
Web Title: Former Commissioner of Education in Sangamner Sukhdev Dere arrested in TET Paper leak case