Home अहमदनगर Ahmednagar: तलाठी भरतीतील ११ डमी वर गुन्हा दाखल

Ahmednagar: तलाठी भरतीतील ११ डमी वर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime filed against 11 dummies in Talathi recruitment

Ahmednagar Crime | अहमदनगर: बनावट कागदपत्रांच्या आधारे पावणे दोन वर्षापूर्वी तलाठी भरतीत डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी गेल्या दोन वर्षापूर्वी गैरमार्गाचा प्रकार घडला होता.

डमी बसलेले उमेदवार हे भंडारा, गडचिरोली, धुळे, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील आहे. या ११ उमेदवारांवर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,.

याबाबत माहिती अशी की, २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान जिल्ह्यातील ८४ तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन देण्यात आली. २३ डिसेंबर २०१९ रोजी १२५ जणांची प्रारूप यादी प्रशासनाने जाहीर केली.

या उमेदवारांना ३ ते ७ जानेवारी दरम्यान कागदपत्रे छाननी साठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले. कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे फोटो व प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत जिल्हाधिकारी यांना संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात आली. यामध्ये ११ उमेदवार डमी असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी वर्षभरानंतर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरून तहसीलदार माधुरी आंधळे यांनी ९ मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Crime filed against 11 dummies in Talathi recruitment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here