Home अहमदनगर अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड: तेराव्या रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड: तेराव्या रुग्णाचा मृत्यू

Ahmednagar District Hospital fire patient dies

अहमदनगर | Ahmednagar: जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांचा जीव गेला होता. तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. १७ नोव्हेंबर रोजी जखमीमधील एकाचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी आणखी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील बळींची संख्या तेरा झाली आहे.

गोदाबाई पोपट ससाणे वय ७० रा. वागंदरी ता, श्रीगोंदा असे मयत रुग्णाचे नाव आहे. लक्षमण असराजी सावळकर रा. बोधेगाव ता. शेवगाव या जखमी रुग्णाचा मृत्यू १७ नोव्हेंबर रोजी झाला होता. जिल्हा रुग्णालयात ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लगली होती. या आगीत ११ जणांचा होरपळून व गुदमरून ११ जणांचा बळी गेला होता. गंभीर जखमी रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या दोघांची प्रकृती खालाविल्याने मृत्यू झाला.  

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Ahmednagar District Hospital fire patient dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here