Home संगमनेर शाळा व्यवस्थापनाने कुठलीही सूचना परस्पर देऊ नये: अमोल निकम

शाळा व्यवस्थापनाने कुठलीही सूचना परस्पर देऊ नये: अमोल निकम

Sangamner School management should not give any instructions

संगमनेर | Sangamner: कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना शाळा महाविद्यालये सुरु होत आहे. मात्र मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करावी आणि पहिल्याच दिवशी अहवाल शाळेत जमा करावा अशी सूचना काही शाळांकडून पालकांना करण्यात आली. कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असतानाच आता संगमनेर तालुक्यातील खासगी शाळांनी मनमानी सुरू केली असल्याचा प्रकार समोर येत आहे.

22 नोव्हेंबर पासून शाळांचे द्वीतीय सत्र सुरू होत आहे. सकाळी दहा ते दोन या वेळेत शाळा सुरू राहणार आहेत.

1 डिसेंबर पासून बस व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खाजगी शाळांनी आता पालकांना व्हाट्सअप मेसेज तसेच पत्र पाठवून मनस्ताप देण्यास सुरुवात केल्याचे आढळून आले आहे. बस ची संपूर्ण फी भरणे आवश्यक राहील असे म्हटले असून त्या संदर्भाने नोटीस दिली जाईल असे स्पष्टपणे सांगितले जात आहे.

नोटीस देणारे हे कोण? असा पालकांना प्रश्न पडला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कोविड टेस्ट  करून प्रमाणपत्रासह पाठवावे असेही बजावण्यात आलेले आहे.

शाळांची ही मनमानी पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणार आहे. जाचक नियम हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्रस्त करणारे ठरणार आहेत.

रॅपिड एंटीजेन टेस्ट करावी असे संगमनेर प्रशासनाचे कुठलेही आदेश नाहीत. तसेच यासंदर्भात कुठलीही जबरदस्ती करता येणार नाही.असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

शाळेत पाठविण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करावी अशी सूचना परस्पर देऊ नये असेही तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले आहे.

Web Title: Sangamner School management should not give any instructions 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here