Home संगमनेर Accident संगमनेर: विजेचा धक्का लागून तीन गायींचा मृत्यू

Accident संगमनेर: विजेचा धक्का लागून तीन गायींचा मृत्यू

Accident Sangamner Three cows die due to electric shock

संगमनेर | Accident: तारेच्या कुंपणात वीजप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून तीन गायींचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे येथे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुले शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

शेतकरी सलीम बाबूभाई तांबोळी रा, समनापूर ता.संगमनेर हल्ली मु. डोळासणे यांच्या गायींचा मृत्यू झाला आहे. सलीम तांबोळी हे वाट्याने शेती करतात. या शेताच्या बाजूला तांबोळी यांची छोटेसे घर असून घराजवळ तारेचे कुंपण आहे. यामध्ये तीन गायी बांधलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी पाउस झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. पहाटेच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने विजेच्या खांबातील वीज प्रवाह कुंपणात उतरल्याने बांधलेल्या तीन गायींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तांबोळी यांनी मोल मजुरी करून व कर्ज घेऊन दोन गायी खरेदी केल्या होत्या. या घटनेत सलीम यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Accident Sangamner Three cows die due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here