Home अहमदनगर डॉ. पोखरणा यांना जामीन देऊ नका: सरकारी पक्षाचा युक्तिवाद

डॉ. पोखरणा यांना जामीन देऊ नका: सरकारी पक्षाचा युक्तिवाद

Ahmednagar Dr. Don't give bail to Pokhrana 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर ;जिल्हा रुग्णालयात अति दक्षता विभागात आग लागून १४ रुग्णांचा बळी गेला आहे. ही मोठी दुर्घटना असून पोलीस याचा सखोल तपास करीत आहे. इमारत पूर्णत्वाचा दाखला नाही, फायर ऑडीट झाले की नाही हे माहित नाही अशा परिस्थितीत अतिदक्षता विभाग सुरु करण्याची परवानगी देण्यात देण्यात आली याच विभागाला आग लागून ही दुर्घटना घडली.

यात दोषी कोण? हे समोर यायचे आहे. जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख म्हणून डॉ. पोखरणा यांची मोठी जबाबदारी आहे अशा परिस्थितीत त्यांना जामीन मिळाला तर या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डो. सुनील पोखरणा व डॉ. सुरेश ढाकणे यांना जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीनेकेदार केसरकर यांनी शुक्रवारी न्यायालयात केला. या जामीन अर्जावर न्यायालय आज शनिवारी निर्णय देणार आहे.

Web Title: Ahmednagar Dr. Don’t give bail to Pokhrana 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here