Home अहमदनगर धक्कादायक पोलिसच बनला गुन्हेगार: बनावट माहिती सादर केल्याने पोलिसावर गुन्हा

धक्कादायक पोलिसच बनला गुन्हेगार: बनावट माहिती सादर केल्याने पोलिसावर गुन्हा

Crime against the police for submitting fake information accident Crime

नेवासा | Accident Crime: अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना बनावट वाहन दाखवून खोटी बनावट कागदपत्रे सादर केल्याने शक्रवारी तपासी अधिकाऱ्यासह चौघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  

याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस उपाधीक्षक रविकिरण दरवडे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सदर गुन्ह्याचा तपासी अधिकारी तथा नेवासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक महेश हरिश्चंद्र कचे, बाळासाहेब संभाजी क्षीरसागर, बाळकृष्ण वाल्मिक आव्हाड, भारत वाल्मिक आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल ककरण्यात आला आहे.

मुरलीधर संभाजी क्षीरसागर याचा २३ डिसेंबर २०१९ रोजी नेवासा शेवगाव रोडवरील भानसाहिवरा परिसरात अपघात झाला होता. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा पोलीस नाईक कचे याने तपास केला होता. तपासात अपघातातील वाहनाचा क्रमांक नमूद न करता बनावट वाहन दाखविण्यात आले. व इतर खोटी बनावट कागदपत्रे तयार केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.  

Web Title: Crime against the police for submitting fake information accident Crime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here