माहेरी आलेल्या विवाहितेचा घरात घुसून तरुणाकडून विनयभंग
अहमदनगर | Crime News: नगर शहरातील एका उपनगरात माहेरी आलेल्या विवाहितेसोबत घरात घुसून गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब नामदेव वाबळे (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिडीतेने फिर्याद दिली आहे.
पीडित महिला ही दिवाळीनिमित तिच्या माहेरी आली होती. २५ नोव्हेंबर रोजी पीडित महिला घरी असताना बाळासाहेब वाबळे तिथे आला. त्याने पीडितेला जवळ ओढत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी पीडिता त्याला विरोध करत असताना तिच्या गळ्यातील गंठण तुटून गहाळ झाले आहे.
याचवेळी पीडितेचा पती त्याठिकाणी आला असता वाबळेने त्यालाही शिवीगाळ करत तुम्ही कुठे जाताय, असे म्हणत तलवारीने कापण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.
Web Title: Crime News married woman who had come to Maheri and molested