Accident: रस्त्यावर खड्ड्यात रिक्षा पलटी, पाच जण जखमी
राहुरी | Accident: राहुरी तालुक्यातील आंबी देवळाली रस्त्यावर एका खड्ड्यात रिक्षा पलटी होऊन अपघात झाल्याची घटना झाली आहे. शनिवारी दि. २७ रोजी सकाळी हा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.
या अपघातात रिक्षाचालक किसान भंगारदिवे, ताराबाई पवार, मच्छिंद्र दादा मगर आणि इतर दोन जण हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवासी हे आंबी अंबळनेर येथील आपल्या नातेवाईक यांच्या अंत्यविधीसाठी जात असताना ही अपघाताची घटना घडली आहे. आंबी देवळाली रस्त्याची मोठ्या दुरवस्था झालेली असून येथे अपघाताच्या घटना घडत असतानादेखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
Web Title: Rahuri Accident rickshaw overturned in a ditch on the road