Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: अज्ञातांनी केली एसटी बसवर दगडफेक  

अहमदनगर ब्रेकिंग: अज्ञातांनी केली एसटी बसवर दगडफेक  

Ahmednagar Stones were hurled at the ST bus by unknown persons

नेवासा | Ahmednagar: तालुक्यात शेवगाव आगाराची येणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील सौंदाळा परिसरातील हॉटेल जयराजश्री जवळ आज (दि.27 नोव्हेंबर) सकाळी ९:३० सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली.

शेवगाव डेपोची बस क्रमांक एम एच ४० एन ८८९५ या बसवर दगडफेक करण्यात आली. यात बस चालकाच्या बाजूची पुढची एक काच फुटली आहे.  ही बस शेवगाव कडून नेवासाकडे जात असताना ही घटना घडली. दगडफेक करणारे मात्र पसार झाले आहेत. राज्यात कर्मचारी वर्गाचा संप सुरु असून शेवगाव तालुक्यातील आगारातील संप मागे घेत बस चाक सुरु केले असल्याने ही दगडफेक झाली असल्याची चर्चा होत आहे.

Web Title: Ahmednagar Stones were hurled at the ST bus by unknown persons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here