Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात या दिवशी  पडणार धो धो पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

अहमदनगर जिल्ह्यात या दिवशी  पडणार धो धो पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Ahmednagar This day heavy rain alert

अहमदनगर | Heavy Rain Alert:  बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील अहमदनगरसह ११ जिल्ह्यांत धो धो पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील अनेक भागात मुसळधार पाउस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दक्षिण भारतात तमिळनाडू ते केरळ व पुढे आंध्रप्रदेश किनारपट्टीवर तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२९ नोव्हेंबर पासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तिव्र होत असल्याने वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीने वाढला असल्याने राज्यातील  ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात २८ ते ३०, मध्य महाराष्ट्रात २९ व ३०, तर मराठवाड्यात ३० नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील खालील जिल्ह्यात कंसातील तारखेला पाउस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 नगर (२९),  सातारा (२९,३०),  सांगली (२९, ३०)  मुंबई (३०),  पुणे (२९, ३०),  कोल्हापूर (२९,३०), ठाणे (३०),  रायगड (२९, ३०),  रत्नागिरी (२९,३०),  सिंधुदुर्ग र (२९,३०),  नाशिक (३०)

Web Title: Ahmednagar This day heavy rain alert

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here