Home Accident News अहमदनगर: महिला डॉक्टरचा अपघातात मृत्यू, डंपरने मोपेडला चिरडले- Accident

अहमदनगर: महिला डॉक्टरचा अपघातात मृत्यू, डंपरने मोपेडला चिरडले- Accident

Ahmednagar Accident: कायनेटिक चौकात भीषण अपघात झाल्याने महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना.

Ahmednagar Female doctor dies in an accident

अहमदनगर: शहरातील कायनेटिक चौकात भीषण अपघात झाल्याने महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

नगर शहरात गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. सकाळी साडेदहाच्या दरम्यान शहरातील कायनेटिक चौकात ही घटना घडली. शिबोन अशोक टेंभेकर (वय ५६,रा.अरणगाव,ता.नगर) असे मयत महिलेचे नाव आहे.

मयत महिला टेंभेकर या डॉक्टर होत्या.बांधकामासाठी लागणार्‍या खडीची वाहतूक करणार्‍या डंपरने मयत महिलेला चिरडले. अपघातात महिलेच्या मोपेड गाडीचा चक्काचुर झाला.डंपरच्या पुढील चाकाखाली टेंभेकर यांची गाडी गेली. अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी शिबोन टेंभेकर यांना उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.अपघातानंतर डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला.

Web Title: Ahmednagar Female doctor dies in an accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here