Home अकोले राजूर: सर्वोदय विद्यालयात कलामंडळ व क्रीडामंडळ उद्घाटन कार्यक्रम संपन्न  

राजूर: सर्वोदय विद्यालयात कलामंडळ व क्रीडामंडळ उद्घाटन कार्यक्रम संपन्न  

Sarvoadaya Vidya Mandir Rajur: दैनंदिन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या अंगात असलेले सुप्त कला गुण बाहेर पडण्यासाठी त्यांना एखाद्या व्यासपीठाची आवश्यकता असते. महाविद्यालयातील कलामंडळ विभाग त्यासाठी उत्तम व्यासपीठ असते. विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत आपले कलाविष्कार सादर करावेत ,असे प्रतिपादन डॉ. संजय गोर्डे यांनी केले.

Sarvoadaya Vidya Mandir Rajur

राजूर: अकोले तालुक्यातील राजूर गावातील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर सकाळी ८:३० वाजता कलामंडळ उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॉ. संजय गोर्डे ता. संगमनेर यांच्या हस्ते कलामंडळाचे उदघाटन करण्यात आले. तर क्रीडामंडळाचे उदघाटन सत्यानिकेतन संस्थेचे संचालक अशोक मिस्त्री यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.डी. लेंडे होते. तर कार्यक्रमाचे आयोजन कलामंडळ अध्यक्ष बी.एस. घिगे आणि सौ. एस. व्ही भालेराव यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक डॉ. संजय गोर्डे यांनी प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलित करून श्रीफळ वाढविले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. लेंडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्राचार्य बी.एन. ताजणे यांनी केले.

Sarvoadaya Vidya Mandir Rajur kala

दैनंदिन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या अंगात असलेले सुप्त कला गुण बाहेर पडण्यासाठी त्यांना एखाद्या व्यासपीठाची आवश्यकता असते. महाविद्यालयातील कलामंडळ विभाग त्यासाठी उत्तम व्यासपीठ असते. विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत आपले कलाविष्कार सादर करावेत ,असे प्रतिपादन डॉ. संजय गोर्डे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीचे धडे देखील दिले. कविता कशी जन्माला येते याचा स्वनाभुव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. लेंडे सर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांतून उद्याचे कलाकार, लेखक, कवी जन्माला येवोत असे आवाहन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

kala2 Sarvoadaya Vidya Mandir Rajur

यावेळी अशोक मिस्त्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच उपप्राचार्य बी.एन. ताजणे यांनी प्रत्येक खेळाडूला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी क्रीडा शिक्षक व्ही.टी. तारू यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. यावेळी विविध विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपले खेळ कौशल्य दाखवीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

Sport Sarvoadaya Vidya Mandir Rajur

तसेच या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी मंडळ स्थापन करण्यात आले असून विद्यालयात शिक्षक एस.आर. बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मोत्थान वर्ग सुरु करण्यात आले.  

Inauguration program of the Kalamandala and Sports Association SVM Rajur
संपादन- अजित गुंजाळ

या कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्थेचे संचालक विजय पवार, प्राचार्य एम.डी. लेंडे, उप प्राचार्य बी.एन. ताजणे, जेष्ठ शिक्षक डी.जी. बुऱ्हाडे, ए. एफ. धतुरे, सौ. बिना सावंत, किशोर देशमुख  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शरद तुपविहीरे यांनी केले तर बी.एस. घिगे यांनी सर्वांचे आभार मानले.  

Web Title: Inauguration program of the Kalamandala and Sports Association SVM Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here